नवी मुंबईत गणेश नाईकांचे खंदे समर्थक संदीप म्हात्रेंवर जीवघेणा हल्ला

संदीप म्हात्रे यांच्या नवी मुंबईतील जनसंपर्क कार्यालयात घुसून दोघा जणांनी कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे.

नवी मुंबई : भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे खंदे समर्थक असलेल्या संदीप म्हात्रे यांच्यावर हल्ला झाला. संदीप म्हात्रे यांच्या नवी मुंबईतील जनसंपर्क कार्यालयात घुसून दोघा जणांनी कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. म्हात्रे यांच्या हाताला जखम झाली असून त्यांच्यावर वाशीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संदीप म्हात्रे यांना उपचारासाठी वाशीतील महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. एका हल्लेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

(Navi Mumbai Ganesh Naik Supporter Sandeep Mhatre attacked with sickle)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI