पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं…
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव दिसत नसल्याचं सांगितलं जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव दिसत नसल्याचं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यावरूनच आता एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. या प्रकाराबाबत विचारताच गणेश नाईक यांनी मला माहिती नाही, आयुक्तांना याबाबत विचारा असं सांगितलं. पुढे ते म्हणाले, ‘महायुतीत सगळं ठीक आहे, कोणतीच नाराजी नाही; मात्र सगळं प्रोटोकॉलनुसार व्हावं अशी अपेक्षा आहे.’ याच प्रकरणावर संजय शिरसाटांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका कार्यक्रमातदेखील असाच प्रकार पाहायला मिळाला होता. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर शिंदेंचं नाव नव्हतंच.
Published on: Jun 15, 2026 12:22 PM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

