Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा

Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा

| Updated on: Oct 18, 2026 | 1:30 PM

नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंनी आपल्या पक्षातील रेजिम चेंजवर लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. संजय राऊत पक्षप्रमुख पद बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही बन यांनी केला. कोविड काळात जमा झालेल्या कथित ९ हजार कोटी रुपयांमधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आव्हानही त्यांनी दिले.

नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंनी स्वतःच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. संजय राऊत सहा महिन्यांत उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पदावरून पायउतार करून स्वतः पक्षप्रमुख होण्याची रणनीती आखत असल्याचा आरोप बन यांनी केला. तसेच, उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याची राऊत यांची योजना असल्याचेही त्यांनी म्हटले.

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी संदीप देशपांडे यांनी आपल्या पराभवासाठी आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरावे, असे बन म्हणाले. संजय राऊत यांनी सोमेश्वर कारखाना आणि शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील खर्चावर आक्षेप घेण्याऐवजी न्यायालयात पुरावे सादर करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.

नमो शेतकरी सन्मान योजना किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कारण मोदीजी आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे बन यांनी स्पष्ट केले. कोविड काळात महाविकास आघाडी सरकारने रोज १०० कोटी रुपये जमा केल्याचा आरोप करत, त्यातील ३०-४० हजार कोटी रुपये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली.

Published on: Oct 18, 2026 1:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us