मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. मुंबईत वाघमारे जिथे दिसतील, तिथे त्यांना ठोकणार, असा इशारा महेश डोंगरे यांनी दिला आहे. तर वाघमारेंना मारहाण करणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा कपिल कोरके यांनी केली. कपिल कोरके यांनी वाघमारेंनी मराठा समाजातील माता-माऊली, महिला आणि मुलींची माफी मागावी, अशी मागणी […]
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. मुंबईत वाघमारे जिथे दिसतील, तिथे त्यांना ठोकणार, असा इशारा महेश डोंगरे यांनी दिला आहे. तर वाघमारेंना मारहाण करणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा कपिल कोरके यांनी केली.
कपिल कोरके यांनी वाघमारेंनी मराठा समाजातील माता-माऊली, महिला आणि मुलींची माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी प्रत्यक्ष माफी मागावी, असा आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, या वक्तव्यांमुळे मराठा-ओबीसी वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.नवनाथ वाघमारेंविरोधात मराठा नेते आक्रमक; 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
Published on: Aug 18, 2026 10:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
