Video : राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, पाहा व्हीडिओ
मुंबई : हनुमान चालिसाप्रकरणी अटक आणि नंतर जामिनावर बाहेर असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी विशेष न्यायालयात करण्यात आली आहे. राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत, असा असल्याचा दावा या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी करताना सरकारी पक्षाने […]
मुंबई : हनुमान चालिसाप्रकरणी अटक आणि नंतर जामिनावर बाहेर असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी विशेष न्यायालयात करण्यात आली आहे. राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत, असा असल्याचा दावा या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी करताना सरकारी पक्षाने केला आहे. राणा दाम्पत्य जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाबाबत प्रसिद्धीमाध्यमांत भाष्य न करण्याची अट न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना घातली होती. त्या अटीच दिली. राणा दाम्पत्याने उल्लंघन केले आहे, असा दावा करून पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर राणा दाम्पत्यातर्फे गुरुवारी युक्तिवाद करण्यात येणार होता. परंतु ते दोघे किंवा त्यांच्यावतीने युक्तिवाद करणारे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

