मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी… राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. नवनीत राणा, छगन भुजबळ, अमरसिंह पंडित आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. नवनीत राणा, छगन भुजबळ, अमरसिंह पंडित आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
दरम्यान, या जागेसाठी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र नवनीत राणा यांनी फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
त्या म्हणाल्या, “पदासाठी पक्षाची विचारधारा सोडणार नाही. मी भाजपची प्रमाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी भाजपसाठीच कार्यरत राहिन. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मी सुनेत्रा पवारांना भेटले. त्यांना सांगितले की ही जागा भाजपसाठी सोडावी मात्र काही कारणास्तव हे शक्य झाले नाही.”
या पोस्टनंतर नवनीत राणा यांनी राज्यसभेसाठी भाजप आणि विचारधारा बदणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
