Navneet Rana | मी राजकारणात आले, म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो – नवनीत राणा

राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिल्यानंतर नवनीत राणा यांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच मी राजकारणात आले म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jun 22, 2021 | 9:23 PM

युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राणा यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आज नवनीत राणा यांना मोठा दिलासा दिला आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिल्यानंतर नवनीत राणा यांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच मी राजकारणात आले म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही केला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें