…त्याशिवाय मुंबईचा महापौर शक्य नाही, मोठं विधान करत नवाब मलिकांच्या दाव्यानं खळबळ
30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केलाय. आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊच शकत नाही असं देखील नवाब मलिक म्हणाले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादीचे उमेदवार ताकदीचे प्रचार करत आहेत त्यामुळे, 30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केलाय.आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊच शकत नाही असं देखील नवाब मलिक म्हणाले. मुंबईमध्ये 94 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढवत आहेत असं मालिकांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे.
लोकं दावा करतात आमचा महापौर होईल, पण आमच्याशिवाय महापौर होऊच शकत नाही असा ठाम विश्वास मालिकांनी व्यक्त केला आहे. आमचाच महापौर कसा होईल यावर आम्ही दिशा ठरवू असं वक्तव्य करत मालिकांनी विरोधकांना एक प्रकारे चॅलेंजच दिले आहे. बाहेरचे नेते येऊन सांगतात अजित पवार हे कमकुवत आहेत हे बोलणं योग्य नाही, ते एक मोठे नेते आहेत. अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एक आघाडी करून लढत आहेत असं माध्यमांशी संवाद साधतांना नवाब मालिकांनी स्पष्टपणे सांगितलेलं दिसून येतंय.
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा

