Nawab Malik | भाजप राज्य सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्यात अपयशी: नवाब मलिक

नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मिती आपत्ती निर्माण झाल्यावरही आमच्या सरकारने यशस्वीपणे परिस्थिती हाताळली आहे, असं मलिक यांनी सांगितलं. 

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा लेखाजोखा मांडतानाच भाजपवर निशाणा साधला. दोन वर्षापूर्वी आघाडीचं सरकार स्थापन झालं. आजच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली. त्या दिवसापासून जनतेला न्याय देणं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचा दृष्टीकोण आम्ही ठेवला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मिती आपत्ती निर्माण झाल्यावरही आमच्या सरकारने यशस्वीपणे परिस्थिती हाताळली आहे, असं मलिक यांनी सांगितलं.  राज्यातील ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ठाकरे सरकारचा लेखाजोखा मांडला आहे. यावेळी बाते कम, काम ज्यादा, हेच आमच्या सरकारचं धोरण आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष भाजपवर देखील निशाणा साधला आहे. भाजप राज्य सरकारविरोधात वातावरण तयार करण्यात अपयशी ठरल्याची टीका  नवाब मलिक यांनी केली.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI