AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawab Malik | वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर छापे पडलेले नाहीत – मलिक

| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 1:08 AM
Share

क्फ बोर्डात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. ईडीची छापेमारी वक्फ बोर्डावर नाही तर बोर्डाशी संबंधित कार्यालयावर सुरु सल्याचं मलिक यांनी सांगितलं. ‘वक्फ बोर्डावर छापे पडले नाही. वक्फ बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर छापे पडले आहेत.

मुंबई : पुणे आणि अन्य ठिकाणी वक्फ बोर्डावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची छापेमारी सुरु झाल्याची माहिती आहे. या छापेमारीचा संबंध अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी जोडला जात आहे. अशावेळी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. वक्फ बोर्डात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. ईडीची छापेमारी वक्फ बोर्डावर नाही तर बोर्डाशी संबंधित कार्यालयावर सुरु सल्याचं मलिक यांनी सांगितलं. ‘वक्फ बोर्डावर छापे पडले नाही. वक्फ बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर छापे पडले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो. पुण्यातील एक ट्रस्ट आहे. ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट, तालुका मुळशी पुणे, हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत रजिस्टर आहे. 19 मे, 2005 ला चॅरिटी कमिश्नरकडून वक्फ बोर्डाकडे ट्रान्सफर झाला. डीन रजिस्ट्रेशनने लोकशाही आघाडी सरकार आलं तेव्हा वक्फ अॅक्ट लागू झाला. त्यामुळे चॅरिटी कमिश्नरकडे असलेल्या संस्था त्याचं डीम रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय चॅरिटी कमिश्नरने घेतला. त्यावेळी मी राज्यमंत्री होतो. आम्हीही वक्फ अॅक्ट 1995 आम्ही लागू केला’, असं नवाब मलिक म्हणाले.