ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला NCB कडून क्लिनचीट
या प्रकरणात आर्यन खान, अवीन साहू आणि 4 कार्यक्रम आयोजकांविरुद्ध पुरेशा पुराव्याअभावी कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. आर्यन जवळपास एक महिना कोठडीत होता.
ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीकडून त्याला क्लीनचीट मिळाली आहे. आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबी (NCB) मार्फत मुंबई सत्र न्यायालयात आज आरोपपत्र (Chargesheet) सादर करण्यात आलं. एकूण 6000 पानांचे आरोपपत्र आज (27 मे शुक्रवार) दुपारी सादर करण्यात आलं. आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने क्रूजवर धाड टाकत ड्रग्जप्रकरणी कारवाई केली होती. कॉर्डेलिया क्रूज ड्रग प्रकरणी एकूण 20 लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात आर्यन खान, अवीन साहू आणि 4 कार्यक्रम आयोजकांविरुद्ध पुरेशा पुराव्याअभावी कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. आर्यन जवळपास एक महिना कोठडीत होता.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट

