Drugs Case: केवळ WhatsApp चॅटच्या आधारे आम्ही पुरावे गोळा करू शकत नाही- NCB

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून क्लीन चिट मिळाली आहे. आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडे अंमली पदार्थ आढळून आले, असं एनसीबीचे उपमहासंचालक (ऑपरेशन्स) संजय कुमार सिंग म्हणाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 27, 2022 | 3:27 PM

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून क्लीन चिट मिळाली आहे. आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडे अंमली पदार्थ आढळून आले, असं एनसीबीचे उपमहासंचालक (ऑपरेशन्स) संजय कुमार सिंग म्हणाले. 14 जणांविरुद्ध NDPS कायद्याच्या विविध कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्वरित सहा जणांविरुद्ध पुराव्याअभावी तक्रार दाखल केली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी एनसीबीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. ड्रग्जप्रकरणी आंतरराष्ट्रीय कट रचल्याची कोणतीही गोष्ट यात सिद्ध होऊ शकत नाहीये. फक्त व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारे आम्ही पुरावे गोळा करू शकत नाही, असं एनसीबीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं. त्याचप्रमाणे नवीन कोणते पुरावे आढळल्यास आम्ही या प्रकरणाचा खोलवर तपास करू, असंही एनसीबीने म्हटलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें