अन् अजित पवार यांनी नेमका कुणाला मारला डोळा? व्हिडिओ होतोय व्हायरल

हर्षदा शिनकर, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 10, 2023 | 8:12 AM

VIDEO | अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे बोलत असताना अजित पवार यांनी कुणाला आणि का मारला डोळा? बघा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा विधानसभवनाबाहेरील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला यानंतर विरोधकांनी यावर चांगलीच टीका केली. यादरम्यान उद्धव ठाकरे हे देखील प्रतिक्रिया देण्यासाठी विधानभवनाबाहेर आले यावेळी अजित पवार बोलत होते मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना जागा करून दिली. त्यांच्याबाजूनला अजित पवार उभे होते. उद्धव ठाकरे हे अर्थसंकल्पावर बोलत असताना अजित पवार यांनी कुणाला तरी डोळा मारला आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र अजित पवार यांनी कोणाला डोळा मारला याचीच सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उद्धव ठाकरे बोलत असताना अजित पवार यांचे याकडे अजिबात लक्ष नव्हते. अजित इकडे तिकडे त्यांच्या बाजूला उभे असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर ते हात ठेवत बाजूला पाहत हळूच कोणाला तरी डोळा मारल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI