AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचं मंत्रिमंडळात कमबॅक, अखेर नाराजी दूर? अशी आहे राजकीय कारकिर्द

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचं मंत्रिमंडळात कमबॅक, अखेर नाराजी दूर? अशी आहे राजकीय कारकिर्द

| Updated on: May 20, 2025 | 12:21 PM

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा रिक्त झाली होती. आज सकाळी 10 वाजता राजभवनात शपथविधी होणार आहे. भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा हेच खातं देण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडे असणारं अन्न व नागरी पुरवठा खातं छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. छगन भुजबळ आज सकाळी १० वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.  धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या खात्यावर नाराज छगन भुजबळ यांचं पुनर्वसन करण्यात येतंय.

 अशी आहे राजकीय कारकिर्द

शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात

1973 मुंबई पहिल्यांदा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवड

1973 ते 84 मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता

1985 मध्ये मुंबईचे महापौर

1991 मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत मुंबईचे महापौर

1991 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळांचा राष्ट्रवादीत प्रवेश

1985 आणि 1990 अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड

नोव्हेंबर 1991 मध्ये महसूलमंत्री आणि 1995 पर्यंत गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री

एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते

18 ऑक्टोबर 1999 रोजी उपमुख्यमंत्री आणि गृह आणि पर्यटन खातं

एप्रिल 2002 मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड, एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदी

2004 मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड

नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री

2010 रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले

पुढे महसूल, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम अशा विविध मंत्रिपदाची जबाबदारी

Published on: May 20, 2025 09:49 AM