Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री, मंत्रिपदाची अशी घेतली शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
प्रचंड बहुमताने आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या यदीत छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी आपली नाराजी अनेकदा बोलून दाखवली होती. मात्र आज पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या खात्यावर नाराज छगन भुजबळ यांचं पुनर्वसन करण्यात आलंय. बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि अन्न व नागरी पुरवठा खातं त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं होतं. मात्र त्याच खात्यावर भुजबळांची वर्णी लागली आहे. बघा भुजबळांचा शपथविधी सोहळा…