Chhagan Bhujbal : वक्त वक्त की बात…आज तेरा कल मेरा… शपथ घेण्याआधीच भुजबळांचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल
प्रचंड बहुमताने आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या यदीत छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी आपली नाराजी देखील कित्येकदा उघडपणे बोलून दाखवली होती
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचं खातं रिक्त होतं. मात्र धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या खात्यावर नाराज छगन भुजबळ यांचं पुनर्वसन करण्यात येत आहे. छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा हा राजभवनात संपन्न होणार आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वीच त्याचा एक जुना व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ज्यावेळी मंत्रिपदावरून भुजबळांना डावलण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी आपली नाराजी कित्येकदा जाहीरपणे बोलून दाखवली होती. अशातच आता त्यांच्या शेअरोशायरीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वक्त वक्त की बात है.. वक्त बदल जायेगा… आज तेरा है कल मेरा आयेगा… असं भुजबळ भाषणाद्वारे बोलताना दिसताय.