Ajit Pawar : असुद्या साहेब आपलं वाटोळं झालं… अजितदादा चिडले, कारमध्ये बसले; नेमकं काय घडलं?
रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यासंदर्भात अजित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पाहणी वेळी अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना चांगलंच खडसावलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टोक्तीपणामुळे आणि वक्तशीरपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. अजित पवार यांनी बऱ्याचदा पहाटेच उठून विकास कामांची पाहणी केली असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अजित पवार यांनी आज पुण्यातील हिंजवडी भागात दाखल होत अनेक विकास कामाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना चांगलेच खडेबोल सुनावलेत.
‘अहो असू द्या हो.. असू द्या हो साहेब… धरण करताना मंदिर जातातच की नाही… तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो मी काय करायचे ते करतो…. आपलं वाटोळं झालं आपलं हिंजवडीचं सगळं आयटी पार्क चाललं… माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर.. बंगळुरू आणि हैदराबादला….काय तुम्हाला पडलं नाही….’, असं म्हणत अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना फटकारलं. पुढे अजित पवार असेही म्हणाले, कशाला मी सहा वाजता येतो मला कळत नाही माझी माणसं नाहीत..
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

