AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee on Sharad Pawar | 'शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारली'-tv9

Mamata Banerjee on Sharad Pawar | ‘शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारली’-tv9

| Updated on: Jun 15, 2022 | 8:24 PM
Share

रम्यान राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीवरून रणनिती ठरविण्यासाठी आज दिल्लीत देशातील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी नकार दिला असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली: देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल हा संपत असून देशाचे नवे राष्टपती कोण असा सवाल सर्व सामान्यांना पडत आहे. तर राष्ट्रपती पदाची निवडणूक (Presidential election) जुलैमध्ये होत आहे. त्यामुळे देशातील घडामोडींना वेग आला आहे. देशातील सत्ताधारी आणि विरोधक पक्ष हे उमेदवार कोणता द्यायचा याची चाचपणी करत आहेत. याचदरम्यान राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव पुढे आले होते. तसेच त्यांनी या निवडणुकीत विरोधकांच्या बाजूने उभे रहावे यासाठी ममता बॅनर्जी यांनी त्यांची भेट घेतली होती. दरम्यान राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीवरून रणनिती ठरविण्यासाठी आज दिल्लीत देशातील विरोधी पक्षांची बैठक (Delhi Meeting) पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी नकार दिला असल्याचे समोर आले आहे. तर आपला पाठिंबा हा एकच सर्वसमावेशक उमेदवार जो असेल त्याला असेल असेही पवार यांनी सांगितल्याचे कळत आहे.

 

Published on: Jun 15, 2022 08:24 PM