Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी निवडला मन:शांतीचा मार्ग, गेल्या 8 दिवसांपासून नेमके आहेत कुठे?
गेल्या ८ दिवसांपासून धनंजय मुंडे हे इगतपुरीतील विपश्यना केंद्रात असल्याची माहिती समोर येत आहे. मनःशांतीसाठी गेल्या आठ दिवसांपासून मुंडे इगतपुरीतील विपश्यना केंद्रात आहेत.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे मन:शांती आणि ध्यानसाधनेसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात गेल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून धनंजय मुंडे हे ध्यानसाधनेत मग्न झालेत. दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांमध्ये सततच्या वादामुळे चर्चेत राहिलेल्या धनंजय मुंडे यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. यानंतर मुंडेंच्या जागी आता मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरच मुंडे विपश्यनेसाठी गेल्याची चर्चा होत आहे. मनःशांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात गेल्या ८ दिवसांपासून आहेत. दहा दिवसांच्या कोर्ससाठी धनंजय मुंडे इगतपुरीतील विपश्यना केंद्रात गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

