Jitendra Awhad Video : ‘शिवराय, बाबासाहेबांना अरे-तुरे, शब्द मागे घे, नाहीतर …’, आव्हाड भडकले अन् राहुल सोलापूरकरची काढली लायकी
वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असं वक्तव्य करत राहुल सोलापूरकर याने नवा जावई शोध लावला आहे. सोलापूरकर याने नवं वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे.
औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरने आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वक्तव्य करून वाद निर्माण केलाय. वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असं वक्तव्य करत राहुल सोलापूरकर याने नवा जावई शोध लावला आहे. यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच भडकले आहे. आव्हाड म्हणाले, ‘मनुवाद्यांच्या डोक्यामधलं चातुरवर्णांचं भूत कधीही जाणार नाही. जो शिकलेला असेल, जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल. हा सोलापूरकर बोलतोय आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो. आता याच्या कानाखाली जाळ काढला की याच्यातला मनुवाद बरोबर जागा होईल’, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
पुढे ते असेही म्हणाले, शिवाजी महाराज, बाबासाहेबांबद्दल बोलायची गरज काय आणि समाजामध्ये विष कालवायची गरज काय? सोलापूरकर तुम्ही बाबासाहेबांना अरे तूरे म्हणताय तो आमचा बाप आहे. तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं. गप्प आपले शब्द माघे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे पण शब्द मागे घे आणि यांच्याबद्दलही माघे घे. नाहीतर मी तुला मारणार, असं आव्हाड म्हणाले. ‘बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अरे तुझी लायकी काय आहे? राहुल सोलापूरकर जे काय बरळलाय त्याने फक्त वाद निर्माण होऊ शकतात, याला जन्माची अक्कल शिकवणार’, असल्याचेही आव्हाड म्हणाले.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
