अडचणीत आणणारा संकट मोचक मित्र गिरीश महाजन, एकनाथ खडसे करणार जाहीर सत्कार
एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर त्यांना महसूल खात्याने नोटीस पाठविली. यावरून खडसे यांनी गिरीश महाजन यांना आमच्या जुन्या मित्राने अडचणीत आणले असा टोला लगावला होता. आता याच मित्राचा एकनाथ खडसे जाहीर सत्कार करणार आहेत.
जळगाव | 2 नोव्हेंबर 2023 : जळगाव जिल्ह्यातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. गिरीश महाजन फक्त नावालाच संकट मोचक आहेत. फक्त पुढे पुढे करणारे संकट मोचक आहेत. गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाचा सोडाच पण जळगाव जिल्ह्यातील कोळी समाजाचा तरी प्रश्न सोडवला तर त्यांचा जाहीर सत्कार करेन असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. गिरीश महाजन यांना ओपन चॅलेंज आहे. फक्त पुढे पुढे करणारे संकट मोचक फेल झाले म्हणूनच जरांगें पाटील यांचे उपोषण सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली. महाजन यांच्यासह दोन्ही मंत्र्यांची जर पत असेल तर त्यांनी नियमानुसार आरक्षणाचा प्रश्न सोडवून दाखवावा. तुम्ही स्वतःला महाराष्ट्राचे नेते म्हणवून घेता. पण, मराठा समाजाचा नाही तर किमान कोळी समाजाचा तरी प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांनी सोडवून दाखवावा त्यांचा संकट मोचक म्हणून सत्कार करेल असे आव्हान खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिले.
Published on: Nov 02, 2023 10:45 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
