अन् अजितदादा भरसभेतचं गाणं गुणगुणायला लागले; व्हिडीओ पाहाल तर म्हणाल…

जरी राणा भाजपमध्ये गेला म्हणजे आमचं बोलणं बंद आहे, असं काही नाही. त्यामुळे त्यांनाही विचारेल. वस्तुस्थिती जाणून घेईल, असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिली.

भीमराव गवळी

|

Oct 01, 2022 | 5:31 PM

संतोष जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, उस्मानाबाद: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar) हे अत्यंत शिस्तप्रिय, रागीट आणि कडक स्वभावाचे आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला (maharashtra) माहीत आहे. पण अजितदादा सुद्धा मिश्किल स्वभावाचे आहेत असं सांगितलं तर? अजित पवारही गाणं गुणगुणतात? असंही सांगितलं तर? आश्चर्य वाटेल ना? अहो, पण ते खरं आहे. अजितदादा जसे कडक स्वभावाचे आहेत, तसेच ते हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावाचेही आहेत. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येतही असतो. आज उस्मानाबादकरांना (osmanabad) तर चक्क अजितदादांच्या तोंडून गाणच ऐकायला मिळालं. त्याचं घडलं असं, अजितदादांची उस्मानाबादेत सभा सुरू होती. त्यावेळी मध्येच एका व्यक्तीने त्यांना चिठ्ठी पाठवली. अजितदादांनी आपलं भाषण थांबवलं. ए द्या रे त्याची चिठ्ठी. द्या… असं म्हटल्यानंतर लगेच अजितदादांनी चिठ्ठी आयी है, चिठ्ठी आयी है, असं गाणं गायला सुरुवात केली. दादांचा हा अंदाज पाहून टाळ्या पडल्या नसतील तर नवलच. उस्मानाबादकरांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. त्यावर अजितदादाही हसले.

त्यानंतर अजितदादांनी ती चिठ्ठी वाचली. अन् मी लक्ष घालतो. मी साखर आयुक्तांशीही बोलतो. हे चुकीचं आहे. राणांचा असो वा कुणाचाही असो साखर कारखाना, भाव दिलाच गेला पाहिजे. मी राणांशीपण बोलेन. जरी राणा भाजपमध्ये गेला म्हणजे आमचं बोलणं बंद आहे, असं काही नाही. त्यामुळे त्यांनाही विचारेल. वस्तुस्थिती जाणून घेईल, असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिली. त्याचं सभेला आलेल्या नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें