AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : मैं पुराना सिक्का हूँ, मुझे फेंक न देना… भुजबळांनी शायरीतून मनातील खदखद बोलून दाखवली

Chhagan Bhujbal : मैं पुराना सिक्का हूँ, मुझे फेंक न देना… भुजबळांनी शायरीतून मनातील खदखद बोलून दाखवली

| Updated on: Dec 18, 2024 | 4:44 PM
Share

आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळांचे अनेक कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. यावेळी छगन भुजबळांनी जोरदार भाषण केले. भाषणादरम्यान, छगन भुजबळांनी शायरीच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद भावना व्यक्त केल्यात. “मैं मौसम नही हूँ जो पल में बदल जाऊँ, मैं इस जमीन […]

आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळांचे अनेक कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. यावेळी छगन भुजबळांनी जोरदार भाषण केले. भाषणादरम्यान, छगन भुजबळांनी शायरीच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद भावना व्यक्त केल्यात. “मैं मौसम नही हूँ जो पल में बदल जाऊँ, मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊँ, मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ, मुझे फेंक न देना, हो सकता है बुरे दिनों में मैं ही चल जाऊँ”, अशी शायरी छगन भुजबळ यांनी उपस्थितांसमोर म्हटली आणि मनातील भावना मोकळ्या केल्या. यावेळी महायुती सरकारमध्ये कोणतंही मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले भुजबळ पुढे असेही म्हणाले, “मंत्रिपदावर नसलो तरी तुमच्यासोबत आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी लढणार आहे. तुमच्यासोबत लढता लढता शेवटचा श्वास घेणार आहे. यात मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. जिथे तुमचे प्रश्न आहेत. तिथे आपण एकजुटीने राहायचं आहे. मी तुमच्यासोबत राहणार. तुम्ही हिंमत ठेवा. वाट पाहा. तोपर्यंत आपलं काम सुरू ठेवा. पुढे कदाचित आणखी काही संकटं येण्याचे नाकारता येत नाही. तेव्हा पुन्हा ओबीसी एल्गार करावा लागणार आहे”, असे छगन भुजबळांनी यावेळी म्हटले.

Published on: Dec 18, 2024 04:44 PM