Eknath Khadse | राष्ट्रवादीत आल्यानंतर भाजपमधील गद्दार लोकं कळाली
नाथाभाऊला महाराष्ट्रात बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. पण नाथाभाऊ त्यांना भारी आहे. गिरीश महाजन यांना मी आवाहन करतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही 10 कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत, असा दावा खडसे यांनी केला.
पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप अनेक नेत्यांसह गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच असल्याचं मला कालच समजलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देण्याचा हा सिलसिला सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर नवा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच आहे. हे मला कालच समजलं, असं सांगतानाच मी भाजपमध्ये असलेल्यांना सांगतो की, अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असं आवाहन खडसे यांनी भाजपमधील नेत्यांना केलं.
नाथाभाऊला महाराष्ट्रात बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. पण नाथाभाऊ त्यांना भारी आहे. गिरीश महाजन यांना मी आवाहन करतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही 10 कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत, असा दावा खडसे यांनी केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?