शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर राजकारणात काय घडणार? प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी बैठक झाली होती, अशी माहिती पटेलांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याची आमची सर्वांची भूमिका आहे, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले इतकंच नाहीतर शरद पवार यांना भाजपसोब येण्याची 50 टक्के इच्छा होती...
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही भाजपसोबत जाण्याचा विचार होता. राजकारणात 4 जूननंतर काहीही होऊ शकतं, असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी बैठक झाली होती, अशी माहिती पटेलांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याची आमची सर्वांची भूमिका आहे, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले इतकंच नाहीतर शरद पवार यांना भाजपसोब येण्याची 50 टक्के इच्छा होती, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले, आम्ही दोनवेळा शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांना सोबत येण्याची विनंती केली. आम्ही पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले. तुम्ही सोबत राहिले तर आम्हाला आनंद होईल. तुमच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही काम करु इच्छित आहोत. त्यावेळेस मला तरी ते अनुकूल वाटलेत.
Published on: Apr 14, 2024 05:55 PM
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
