‘मविआ’च्या जागावाटपाच्या चर्चांवर शरद पवार यांनी स्पष्टच म्हटलं….
VIDEO | महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चांवर शरद पवार यांचं स्पष्टीकरण, काय म्हणाले?
पुणे : राज्यात खासदारकीच्या ४८ जागा आहेत. त्या जागांवर महाविकास आघाडी १६-१६ जागांवर लढेल अशी चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी १९ जागांवर लढणार असल्याचे सांगितले. यानंतर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांवर चर्चा झाल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी म्हटलं. गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या बातम्या आणि होणाऱ्या चर्चांना कोणतेही तथ्य नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या या फॉर्म्युलावर अजून चर्चा झाली नाही. तर आता आगामी काळातील निवडणुकीबाबत चर्चा होणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते, मात्र सध्या परमवीर सिंह यांच्याविरोधातही किती तक्रार आल्या आहेत त्यांची नोंद घेतली जावी असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केले आहे. ईडी नोटीस आणि इतर गोष्टींमुळे नेत्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जात आहे, त्यावरूनच भाजपकडून हा सत्तेच्या गैरवापर कसा होतो आहे हे यावरूनच कळून येते असंही शरद पवार यांनी सांगितले.
Published on: May 23, 2023 09:01 AM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
