“सत्तेच्या गैरवापराचे ‘हे’ उत्तम उदाहरण” ; ईडीवरून शरद पवार यांनी भाजपला उघडे पाडले

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, शरद पवार यांनी लोक माझे सांगातीमधून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

सत्तेच्या गैरवापराचे 'हे' उत्तम उदाहरण ; ईडीवरून शरद पवार यांनी भाजपला उघडे पाडले
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 7:25 PM

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना ईडीकडून चौकशीला बोलवल्यानंतर विरोधकांकडून आता सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला गेला आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आता भाजपवर निशाणा साधताना हा सत्तेच्या गैरवापराचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे. शरद पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना नाहक त्रास दिला गेल्यामुळेच त्यांचे महत्वाचे दिवस तुरुंगात गेले असं सांगत त्यांनी भाजप सत्तेचा गैरवापर करुन नेत्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर शरद पवार यांनी समीर वानखेडे यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ज्यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते, नवाब मलिकांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ देत नवाब मलिका यांनी केलेले आरोप हे सत्यावर आधारित होते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते, मात्र सध्या परमवीर सिंह यांच्याविरोधातही किती तक्रार आल्या आहेत त्यांची नोंद घेतली जावी असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केले आहे.

ईडी नोटीस आणि इतर गोष्टींमुळे नेत्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जात आहे, त्यावरूनच भाजपकडून हा सत्तेच्या गैरवापर कसा होतो आहे हे यावरूनच कळून येते असंही शरद पवार यांनी सांगितले.

तर यावेळी 2 हजारच्या नोटाबंदीवर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी याआधीही नोटांबदीचा आदेश दिला होता,

मात्र त्यावेळीही नोटाबंदीमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहोत तसेच त्यावेळीही अनेक कुटुंबं उद्धवस्त झाली होती असं सांगत त्यांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला.

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही त्यांनी बोलताना सांगितले की, या फॉर्म्युलावर अजून चर्चा झाली नसून आता आगामी काळातील निवडणुकीबाबत चर्चा होणे गरजेचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

तर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, शरद पवार यांनी लोक माझे सांगातीमधून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

मात्र फडणवीस यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरं काहीच नसल्याने ते आता लका माझे सांगातीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

यावेळी त्यांनी कर्नाटक निवडणुकीवरूनही त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी काळातील निवडणुका कर्नाटकच्या निकालामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण.
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?.
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.