Chhagan Bhujbal | ‘पांढऱ्या दाढीचा देशावर प्रभाव आहे’-tv9

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ म्हणाले, पांढऱ्या दाढीचा देशावर प्रभाव आहे. ज्यामुळे सभागृहात वातावरण हलके पूलके झाले

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 18, 2022 | 1:52 PM

राज्याचे अधिवेशन हे विरोधकांच्या विरोधाने गाजत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्या एका वाक्याने मात्र सभागृहात वातावरण हलके पूलके झाले. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, एका चर्चेदरम्यान भुजबळ यांनी दाढीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिमटा काढला. ते म्हणाले, मला मुख्यमंत्र्यांकडे बघून खूप आनंद झाला आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झालात यासोबतच मला आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. सफेद दाढीचा प्रभाव हा हिंदुस्तान भर आहे, असं भुजबळ म्हणताच सभागृहातील इतर सदस्यांनी त्याला हसून दाद दिली!

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें