Supriya Sule म्हणाल्या, भुजबळ यांच्याकडून वारंवार टीका होतेय; मी उत्तर देऊ शकते पण…
VIDEO | केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले होते. शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ टीकेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या, 'छगन भुजबळ सतत्याने शरद पवारांवर टीका करतात. ते वयाने मोठे असल्याने मी त्यांना उत्तर देणार नाही.'
सोलापूर, ८ ऑक्टोबर २०२३ | केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीदरम्यान, शरद पवार हे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार म्हणाले होते कोर्ट कचेरी करणार नाही आणि तेच आयोगात हजर होते, असे भुजबळ म्हणाले. शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोलापुरात असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘छगन भुजबळ सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करतात ते वयाने मोठे आहे. त्यामुळे मी त्यांना उत्तर देणार नाही. ते माझ्या वयाचे असते तर त्यांना करारा जबाब दिला असता’, असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

