बीडमध्ये शरद पवार यांची आज तोफ धडाडणार; धनंजय मुडे यांना आव्हान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या सभांना सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर ते पक्ष बांधणासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. याच्याआधी त्यांनी छगन भुजबळ यांच्या मतदार संघात जाऊन तोफ डागली होती.
बीड :17 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्ष बांधणीच्या कामाकडे लक्ष घातले आहे. पक्ष फुटीनंतर ते पहिल्यांच मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात असून त्यांची आज पहिली सभा बीड येथे होणार आहे. तर यासभेतून ते बंडखोर धनंजय मुंडे यांच्यावर काय बोलतात याची उत्सुकता राज्याला लागली आहे. तर शरद पवारांची ही सभा मुंडे यांना कोंडीत पकडणारी ठरू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर त्यांचे स्वागत आमदार संदीप क्षीरसागर हे करणार आहेत. तर क्षीरसागर यांच्याकडून सभेची जोरदार तयारी केली गेली असून त्यांच्याकडून सभेच्या स्थळी पवार यांचे जुणे फोटो लावले आहेत. पाहा हा व्हिडीओ पवार यांच्या सभा स्थळीवरील तायारीचा…

