शरद पवार यांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवलीच; सुप्रिया आणि प्रफुल्ल पटेल यांना केलं कार्याध्यक्ष; अजित पवार याचं काय?

शरद पवार यांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवलीच; सुप्रिया आणि प्रफुल्ल पटेल यांना केलं कार्याध्यक्ष; अजित पवार याचं काय?

aslam shanedivan | Updated on: Jun 10, 2023 | 2:53 PM

पण त्यांनी भाकरी फिरणार असे संकेत दिलं होते. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील भाकरी घरातील लोकांच्यापासूनच फिरणार असेही म्हटलं होतं. पण त्यांनाच यातून वेगळं केलं जाईल असे कोणालाच वाटलं नव्हतं. आज पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त घोषणा करताना अनेकांना धक्का दिला.

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत देत राजीमाना दिला होता. त्यानंतर तो कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे मागे घेतला होता. पण त्यांनी भाकरी फिरणार असे संकेत दिलं होते. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील भाकरी घरातील लोकांच्यापासूनच फिरणार असेही म्हटलं होतं. पण त्यांनाच यातून वेगळं केलं जाईल असे कोणालाच वाटलं नव्हतं. आज पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त घोषणा करताना अनेकांना धक्का दिला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन कार्याध्यक्षांची घोषणा केली. त्यात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची यापदावर नियुक्ती केली. यावेळी व्यासपीठावर फक्त अजित पवार उपस्थित होते. पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांव्यतिरिक्त राज्यसभेची जबाबदारी सोपवली. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, यूपी आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांना राष्ट्रवादीत सध्यातरी कोणतीही जबाबदारी न देणे हे अनेक राजकीय संकेत असल्याचे बोलले जात आहे.

Published on: Jun 10, 2023 2:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us