सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यांवर मोठी जबाबदारी, अजित पवार यांच्यांसाठी काय शरद पवारांच्या मनात काय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतून मोठी घोषणा केली. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची नियुक्ती केली. परंतु अजित पवार यांच्यांकडे काहीच जबाबदारी दिली नाही.

सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यांवर मोठी जबाबदारी, अजित पवार यांच्यांसाठी काय शरद पवारांच्या मनात काय
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 2:00 PM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मागील महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर तीन दिवसांनी त्यांनी राजीनामा मागे घेतला. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करण्यासंदर्भात चर्चा झाली. परंतु त्याला मंजुरी मिळाली नव्हती. अखेर शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या फेरबदलांची घोषणा केली आहे. म्हणजेच शरद पवार यांनी दिल्लीत बसून भाकरी फिरवली आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. परंतु अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी दिली नाही.

अजित पवार यांनी केले होते समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ मे रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून अजित पवार वगळता इतर सर्वांकडून मोठा दबाब आला. अजित पवार शरद पवार यांच्या राजीनाम्याचे समर्थन करत होते. त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या अन् नेत्यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५ मे रोजी त्यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर केला. त्यानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यावेळी अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आणि कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करण्यासंदर्भातही चर्चा झाली. परंतु त्यालाही मंजुरी मिळाली नव्हती.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांचे स्थान काय असणार

आता दिल्लीतून शरद पवार यांनी पक्षातील बदलांची घोषणा केली. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार साईड ट्रॅकवर गेले काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.

कारण सुप्रिया सुळे यांच्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. परंतु अजित पवार यांच्यांकडे काहीच जबाबदारी दिली नाही. शरद पवार यांनी घोषणा केली तेव्हा अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांची काय भूमिका राहणार? शरद पवार यांच्या मनात अजित पवार यांच्यांसंदर्भात काय आहे? या प्रश्नांची चर्चा सुरु झाली आहे.

हे ही वाचा

शरद पवार यांचा राजीनामा मागे घेण्याची घोषणा, पण अजितदादा अनुपस्थित, आहेत कुठे?

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.