शरद पवार यांचा राजीनामा मागे घेण्याची घोषणा, पण अजितदादा अनुपस्थित, आहेत कुठे?

ncp president sharad Pawar press conference : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद शुक्रवारी संध्याकाळी झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. परंतु अजित पवार नव्हते. याबाबत मात्र चर्चा सुरु होती.

शरद पवार यांचा राजीनामा मागे घेण्याची घोषणा, पण अजितदादा अनुपस्थित, आहेत कुठे?
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 6:22 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ मे रोजी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणात विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. पवार यांनी निर्णय घेतला त्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले होते. त्यानंतर २ मे रोजी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून वाय.बी.चव्हाण सेंटरच्या बाहेर कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरुच होते. त्यावेळी गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना सजवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावेळी अजित पवार नव्हते आणि शुक्रवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अजित पवार नव्हते.

वेगळा अर्थ काढू नये

पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी अजित पवार यांचे नाव न घेता शरद पवार म्हणाले की, या ठिकाणी कोणी उपस्थित आहे की नाही? याची चर्चा करु नये, याचा वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले. आपल्या राजीनाम्याची कल्पना अजित पवार यांना दिली होती, असे शरद पवार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीची शुक्रवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या वेळी अजित पवारही उपस्थित होते. बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांना माहिती दिली. परंतु यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही.

शुक्रवारी सकाळी काय झाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. त्यांनी या पदावर कायम राहवे, अशी विनंती केली जात आहे. त्यांनी कोट्यवधी लोकांच्या भावनांचा समावेश करुन राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती करणार आहे, असा ठराव शुक्रवारी सकाळी झालेल्या बैठकीत केला होता.

कार्यकर्त्यांचा जल्लोष

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील निर्णयाची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जल्लोष सुरु करण्यात आले. शरद पवार जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या गेल्या. समितीने कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला गेला, यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे. गेल्या तीन दिवासांपासून कार्यकर्ते या ठिकाणी ठाण मांडून बसले होते.

अजित पवार गेले कुठे

शुक्रवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. परंतु अजित पवार आले नाही. या ठिकाणी काही काळ त्यांची वाटही पाहण्यात आली. यामुळे अजित पवार गेले कुठे? ही चर्चा सुरु झाली. २ मे रोजी सक्रीय असणारे अजित पवार ४ आणि ५ मे रोजी मात्र या सर्व प्रकरणाच्या वेळी शांत होते. सकाळी झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलले नाही.

Non Stop LIVE Update
'जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील...,' काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
'जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील...,' काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे.
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका.
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर.
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?.
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले.
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस.
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट.
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच....
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच.....
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले.
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका.