Sharad Pawar : शिंदेंचा पुढचा ‘रस्ता’ शरद पवारांना कसा दिसला? ही भविष्यवाणी की नवी गुगली? म्हणायचंय तरी काय?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढचा रस्ता कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल असं वक्तव्य शरद पवारांनी केलं पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात पवारांच्या या वक्तव्यावर शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली
एकनाथ शिंदे कधीही जास्त बोलत नाही मात्र त्यांची पुढची भूमिका काय हे लवकरच कळेल असं विधान करून शरद पवारांनी नव्या चर्चेची सुरुवात केली. एकनाथ शिंदेंच्या वारंवार दिल्ली दौऱ्यांबद्दल शरद पवारांना प्रश्न केला गेला त्यावर पवारांनी दिलेल्या उत्तरांनं अनेकांच्याच भुवया उंचावल्या. मागच्या काही दिवसात शिंदेंनी चार वेळा दिल्ली दौरा केला या दौऱ्यामागे अनेकदा महाराष्ट्रातला महायुती सरकार मधला असलेला संघर्ष हे ही कारण देण्यात आलं. त्यावर एकनाथ शिंदेंनी शरद पवारांच्या विधानावर उत्तर देताना आमचा रस्ता एकच असल्याचं म्हणत पवारांच्या विधानाला खोडलंय.
‘आमची वाटचाल बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची वाटचाल आहे आणि मी कुठं दिल्लीमध्ये गेलो होतो हे सगळ्यांना माहिती आहे. प्रधानमंत्र्यांना भेटलो गृहमंत्र्यांना भेटलो त्यामुळे आमची वाटचाल आहे सरळ आहे आम्ही तिरकस जात नाही’, असं एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान शिंदे खरोखर काही वेगळ्या रस्त्याची चाचपणी करतायत की मग शरद पवारांनी ही फक्त एक गुगली टाकली आहे याचं उत्तर येत्या काही काळात मिळणार आहे
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

