‘लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात’, जाहीर सभेतून कुणाला दिला थेट इशारा?
कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यामुळे शरद पवार यांनी सुनील शेळके यांना हा इशारा दिला आहे. मेळाव्याला येऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांना ही दमदाटी केली आणि कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांनी सुनील शेळके यांना इशारा देत चांगलंच सुनावलं
मुंबई, ७ मार्च २०२४ : लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात, असे म्हणत शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना हा थेट इशारा दिला आहे. कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यामुळे शरद पवार यांनी सुनील शेळके यांना हा इशारा दिला आहे. मेळाव्याला येऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांना ही दमदाटी केली आणि कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांनी सुनील शेळके यांना इशारा देत चांगलंच सुनावलं आहे. आज लोणावळ्यामध्ये शरद पवार गटांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला स्वत: शरद पवार उपस्थित होते. या मेळाव्यातूनच आमदार सुनील शेळके यांना शरद पवार यांनी हा इशारा दिलाय. “मला असं समजलं की, तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येतायत म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं?” असा सवाल करत शरद पवार यांनी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांना जाहीर सभेतूनच इशारा देत चांगलंच फटकारलं. तर पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवं. मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, असा थेट इशारा पवारांनी दिला.
Published on: Mar 07, 2024 02:48 PM
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
