Supriya Sule Video : काका-पुतण्या एकत्र… सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे…
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अन् उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आलेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची आज बैठक होतेय. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड साधारण अर्धा चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना खोचक टोला लगावला. ‘त्यांचे उत्तम चाललेलं असते. आता शिवसेनेतून आमचे काही लोकं जे सोडून गेलं. आम्ही शक्यतो त्यांच्या वाऱ्यालाही फिरत नाही.’, असे संजय राऊत म्हणाले. इतकंच नाहीतर ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. पण यांचे बरं असते यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते. यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असं काही नाही. त्यामुळे आमच्या काही भेटीगाठी कुणाशी होत नाही आणि वेळ आली तरी आम्ही टाळतो, असं राऊत म्हणाले. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. ‘प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. एका सशक्त लोकशाहीमध्ये संवाद हा दोन्ही बाजूने असायलाच हवा. कोणत्याही मतदारसंघातील कामानिमित्त अधिवेशन सुरू असताना केंद्रातील प्रत्येक मंत्र्यांची मी भेट घेत असते’, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्या असंही म्हणाल्या, आमचं पडद्यामागे काही नसतं नेहमी पडद्यापुढे असतं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

