NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता पुण्यात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील लक्ष्मीनिवास सोसायटीमध्ये राहणाऱ्या मनीषा हवालदार यांच्या घरी सीबीआयने छापा टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या छापेमारीदरम्यान सीबीआयला NEET प्रश्नपत्रिकेचे काही संच आणि हस्तलिखित स्वरूपातील प्रश्नपत्रिका आढळल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रश्नपत्रिका जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशयही सीबीआयने व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मनीषा हवालदार यांच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘God’ नावाने एक नंबर सेव्ह असल्याचे सीबीआयच्या निदर्शनास आले आहे. या नंबरमागे नेमका कोण आहे आणि NEET पेपरफुटी प्रकरणातील ‘गॉडफादर’ कोण, याचा शोध आता सीबीआय घेत आहे.
या संपूर्ण प्रकरणात मनीषा हवालदार यांची सखोल चौकशी होणार असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.