नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, त्या चौथ्या मजल्यात दडलंय मोठं गूढ? नेमकं काय घडतंय?
देशभराची झोप उडवणाऱ्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे. गेल्या १९ दिवसांपासून सीबीआयचं पथक लातूरमध्येच आहे. हे पथक अनेक तपास करत असून मोटगावकर आणि त्याच्याशी संबंधित लोकांची वारंवार चौकशी करताना दिसत आहे.

याआधी केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय त्याच्याशी संपर्कात असलेल्या डॉ. शिरूर या बालरोगतज्ज्ञाला अटक करण्यात आली. डॉ. शिरूरची पोलीस दलाने कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.
मोटेगावकरच्या क्लासेसशिवाय डॉ. शिरूरच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटवर प्लॅटीनम गॉल्ड बॅच सुरू होती. या बॅचसाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारले जायचे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात शिरूर, कुलकर्णी तसेच मोटेगावकर असे तिघे सामील होते. डॉ. शिरूरने पेपर अनेक ठिकाणी विकण्याचे काम केले, अशी पोलिसांना शंका आहे. याच प्रकरणी सीबीआयने मोटेगावकरच्या बँक खात्यांची, जमिनी-जुमल्याची सखोल चौकशी केली आहे. तरी पोलीस दल इथे आणखी एका मोठ्या संशयाचे निदान करण्यासाठी रात्रंदिवस चौकशी तसेच तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.