AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत मोठ्या घडमोडी! इकडे मंत्री जे. पी. नड्डांकडून आंदोलकांशी चर्चा, तिकडे विरोधी पक्ष नेते थेट...

दिल्लीत मोठ्या घडमोडी! इकडे मंत्री जे. पी. नड्डांकडून आंदोलकांशी चर्चा, तिकडे विरोधी पक्ष नेते थेट…

| Updated on: Jul 21, 2026 | 1:38 PM
Share

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणावरून CJP (Cockroach Janata Party) च्या आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधले आहे. आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आल्याने काही आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या प्रकरणावर देशातील नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

या घडामोडींनंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी CJP च्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीमुळे आंदोलनाकडे केंद्र सरकारचेही लक्ष असल्याचे दिसून आले.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या आंदोलनानंतर अनेक राजकीय पक्षांनी या विषयावर भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.

Published on: Jul 21, 2026 01:38 PM

Follow Us