Maharashtra Corona | महाराष्ट्रात नव्या कोरोना निर्बधांची घोषणा होण्याची शक्यता

मुंबईत तर सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना प्रादुर्भावाची वेग अधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता दिवसागणिक वाढत आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) आता अधिक वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patient) झपाट्याने वाढतेय. मुंबईत तर सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना प्रादुर्भावाची वेग अधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता दिवसागणिक वाढत आहे. फक्त समाधानकारक बाब ही की रुग्ण वाढत असले तरी रुग्णांचं दवाखान्यात दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे. दरम्यान, 7 जानेवारी अर्थात शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले होते. त्याआधी 6 जानेवारी अर्थात गुरुवारी मुंबईत 20 हजार 181 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारापेक्षा अधिक आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI