4 Minutes 24 Headlines | मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका करताना बुलढाणा येथे जाहिर सभेत लोकांना आवाहन केले. यावेळी त्यांनी, मस्त दारू दिली तर ती प्या, कोंबडी दिली, बकरं दिलं तरी खा पण कमळाला मतदान करू नका असे म्हटलं आहे.
4 Minutes 24 Headlines | लोकसभा निवडणुकीसात मविआत जागा वाटपावरून त्रांगडे उठेल असा दावा भाजपकडून करण्यात येत होता. मात्र मविआच्या बैठकीत यात तोडगा निगाला असून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यावेळी ठाकरे गट 21 राष्ट्रवादी 19 काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तर लाच देण्यावरून अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात तक्रार दिली. अनिक्षा डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका करताना बुलढाणा येथे जाहिर सभेत लोकांना आवाहन केले. यावेळी त्यांनी, मस्त दारू दिली तर ती प्या, कोंबडी दिली, बकरं दिलं तरी खा पण कमळाला मतदान करू नका असे म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. यावेळी ठाकरे गट युक्तिवाद करणार आहे. तर न्यायदेवता लोकशाहीचे वस्त्रहरण होऊ देणार नाही असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावर कडवी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही लोक आता सुप्रीम कोर्टालाही सल्ले देऊ लागलेत असा टोला हाणला आहे.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

