AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SuperFast News | अयोध्या दौऱ्यावर राजकारण तापलं; राज्याला अवकाळी, गारपिटीनं झोडपलं... पहा सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या

SuperFast News | अयोध्या दौऱ्यावर राजकारण तापलं; राज्याला अवकाळी, गारपिटीनं झोडपलं… पहा सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या

| Updated on: Apr 10, 2023 | 8:45 AM
Share

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेल्याटी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीस यांनी कशाला अधिक महत्व द्याव हे ठरवा असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपीट झाल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे. त्यामुळे नुकसानीचे युद्ध पातळीवर पंचनामे करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेल्याटी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीस यांनी कशाला अधिक महत्व द्याव हे ठरवा असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री अयोध्येच्या दौऱ्यावर तुपकरांची शिंदेंवर टीका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असा घणाघात बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. शेतकरी राजा अडचणीत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येचा दौरा करत आहेत असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. या राजकीय बातम्यांसह पहा अवकाली पावसाच्या बातम्या….

Published on: Apr 10, 2023 08:45 AM