NIA Raids : NIAची देशभरात छापेमारी! कुठे कुठे सुरु आहे शोधमोहीम? टेटर फंडिंगचा कुणावर आरोप?

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं एनआयए कडून टेरर फंडिंगबाबत कसून तपास केला जातोय. या तपासाला वेग आला असून त्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई एनआयएकडून देशभरात सुरु आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Sep 22, 2022 | 10:32 AM

मुंबई : टेरर फंडिंगसंदर्भात (Terror Funding) NIAकडून महाराष्ट्रात छापेमारी सुरु आहे. एनआयएच्या छापेमारीत महाराष्ट्रातील (Maharashtra Crime News) 20 जणांना अटक करण्यात आली आलीय. महाराष्ट्रातील पुण्यासह नवी मुंबई, भिवंडीत एनआयएने छापेमारी केली. NIAच्या टीमने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front of India) कार्यालयावर देशभर छापे मारण्यास सुरुवात केली आहे. यात यूपी, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांमध्येही NIAच्या पथकाने धाडी टाकल्या आहेत. आतापर्यंत देशभरातून 100हून अधिक जणांना NIAकडून अटक करण्यात आलीय. त्यामुळे पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) चं धाबं दणाणलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं एनआयए कडून टेरर फंडिंगबाबत कसून तपास केला जातोय. या तपासाला वेग आला असून त्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई एनआयएकडून देशभरात सुरु आहे. या छापेमारीसाठी 200 हून अधिक अधिकारी तपास करत असल्याची माहिती समोर आलीय.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें