Nitesh Rane : मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
Nitesh Rane Banner : मातोश्री बाहेर लावण्यात आलेल्या मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरची सध्या चर्चा रंगली आहे.
मुंबईच्या कलानगर परिसरात मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा हिंदू गब्बर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मातोश्री बाहेर लावण्यात आलेल्या या बॅनरची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांचा 23 जून रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बाहेर राणे समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. नितेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नितेश यांचा उल्लेख ‘वस्ताद’ आणि ‘हिंदू गब्बर’ असा केला आहे. यापूर्वी नितेश राणे यांच्या बॅनरवर ‘हिंदूरक्षक’ असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, आता या बॅनरवर नितेश राणे यांचा उल्लेख ‘वस्ताद’ आणि ‘हिंदू गब्बर’ असा करण्यात आला. त्यामुळे हे बॅनर लक्षवेधी ठरत असून, उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या बाहेरच ते लावण्यात आल्यानं राजकीय वातावरण गरम झालं आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि राणे यांच्यातील कलगीतुरा आणखीनच रंगण्याची शक्यता आहे.

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
