नितेश राणेंच्या घराबाहेर सापडली अज्ञात बॅग! बॉम्बशोधक पथकाकडून तपास
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील सुवर्णगड बंगल्याबाहेर एका अज्ञात व्यक्तीने बेवारस बॅग ठेवली. बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉडसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. बॅगेसोबत मोफत बूट आणि कपडे घ्या अशी चिठ्ठी आढळल्याने खबरदारी म्हणून सखोल तपासणी केली जात आहे.
मुंबईत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर एका अज्ञात व्यक्तीने एक बॅग ठेवली होती. ही घटना समोर आल्यानंतर तात्काळ बॉम्बशोधक पथक आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण ही बॅग ठेवून जाताना दिसला. बॅगेसोबत पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे, ज्यावर “प्लीज टेक फॉर फ्री शूज अँड क्लॉथ्स” म्हणजेच, मोफत बूट आणि कपडे घ्या असे लिहिलेले होते. मात्र, हे शासकीय बंगले आणि मंत्र्यांची निवासस्थाने असलेल्या परिसरातील संवेदनशीलतेमुळे पोलिसांनी कोणतीही जोखीम न घेता पूर्ण खबरदारी घेतली. डॉग स्क्वॉडलाही बोलावण्यात आले असून, बॅगेची कसून तपासणी केली जात आहे. बॅगेमध्ये कोणताही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू न आढळल्यास पोलीस याबाबत अधिकृत माहिती देतील.
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा

