Nitesh Rane : मुंबईतील नालेसफाईचं काम पूर्ण झालं नाही; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्रं

तुंबई करून देशात बदनाम करणार आहात का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 16, 2022 | 10:51 AM

मुंबई: पावसाळा तोंडावर आलेला असून अजूनही मुंबईतील नालेसफाईचं काम पूर्ण झालं नाही. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्रं लिहिलं आहे. मुंबईला तुंबई करून देशात बदनाम करणार आहात का? असा सवाल नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. राज्य सरकार व पालिका प्रशासन (bmc) या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थितीत काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांचे आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला (mumbai) तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात, असं सवाल नितेश राणे यांनी केला आहे. नितेश यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्रं लिहून हा सवाल केला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें