देशाच्या बाजूनं की बुरखा घालून… भारत-पाक सामन्यावरून राजकारणात खडाजंगी, राऊत अन् शेलारांमध्ये जुंपली
संजय राऊत हे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान कोणाच्या बाजूने असणार.. ते देशाच्या बाजूने असणार की बुरखा घालून पाकच्या.. अशी जहरी टीका नितेश राणेंनी केली आहे.
सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून चांगलंच घमासान रंगत असल्याचे पाहायला मिळतंय. भारत-पाक सामन्यावरून राजकीय वर्तुळात राजकीय नेतेच आमने सामने आलेत. आम्ही राष्ट्रीय भावना जपायच्या आणि यांनी क्रिकेटच्या सामन्यांना मंजुरी द्यायची हा कोणता राष्ट्रवाद आहे? असा सवाल करत हा देशद्रोह असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. तर भारत आणि पाकिस्तान असा द्विदेशीय कोणताही सामना होणार नाही हे केंद्रीय पातळीवर स्पष्ट झालंय, असं स्पष्टीकरण भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिलंय. दरम्यान, भारत-पाक सामन्यावरून राजकारणात खडाजंगी होतेय. तर संजय राऊत अन् आशिष शेलारांमध्ये जुंपली असताना यामध्ये भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी उडी घेत राऊतांवरच निशाणा साधला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

