Ratnagiri Rain | रत्नागिरीत हवामान खात्याचा रेड अलर्ट, मात्र पावसाची विश्रांती

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची एक सरही पडलेली नाही. आकाशात काळे ढग नसल्यामुळे सूर्यदर्शनही होत आहे. (No rain in Konkan Ratnagiri)

रत्नागिरी: हवामान खात्याने कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी शुक्रवारी सकाळपासून कोकणात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची एक सरही पडलेली नाही. आकाशात काळे ढग नसल्यामुळे सूर्यदर्शनही होत आहे. तर रायगड जिल्ह्यातही सध्या कुठेच फारसा पाऊस नाही. सावित्री, कुडंलिका, आबां, पातळगंगा, गाढी, उल्हास सर्व प्रमुख नद्या ईशारा पातळीपेक्षा कमीने वाहत आहेत.

आजपासून पुढील पाच दिवस कोकणासाठी हवामान खात्याने कोकण परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, याठिकाणी सध्या पूर्णपणे उलटे चित्र पाहायला मिळत आहे. (No rain in Konkan Ratnagiri today after alert issue by imd)