Video: 32 मजली अलिशान टॉवर, धडाम आवाज अन् डोळ्यासमोर पांढरा शुभ्र धूर!, ट्विन पडतानाचा क्षण न् क्षण…

Supertech Tower Demolition: देशातील भ्रष्टाचाराचं उंच प्रतिक असणाऱ्या ट्विन टॉवरला आज जमीनदोस्त करण्यात आलं.  20 कोटींचा खर्च करून हा टॉवर पाडण्यात आला.

Video: 32 मजली अलिशान टॉवर, धडाम आवाज अन् डोळ्यासमोर पांढरा शुभ्र धूर!, ट्विन पडतानाचा क्षण न् क्षण...
गंगनचुंबी टॉवर पाडल्याने 711 लोकांचं स्वप्नभंग, 40 मजले बांधण्याची इच्छा होती
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 28, 2022 | 3:14 PM

देशातील भ्रष्टाचाराचं उंच प्रतिक असणाऱ्या ट्विन टॉवरला (Twin Towers Demolition) आज जमीनदोस्त करण्यात आलं.  20 कोटींचा खर्च करून हा टॉवर पाडण्यात आला. अवघ्या 12 सेकंदात बेकायदा इमले गेले. या टॉवरमध्ये 9 हजार 640 होल करून त्यात 3 हजार 700 किलो दारूगोळा भरण्यात आला होता. आज दुपारी अडीच वाजता हा टॉवर पाडण्यात आला. या टॉवरच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या परिसरात न येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा टॉवर पाडल्यानंतर त्याचा त्याचा राडारोडा हटवण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.  3700 किलो स्फोटकांच्या (blast) सहाय्याने हा टॉवर पाडण्यात आला. आधी सायरन वाजवल्यानंतर बरोबर अडीच वाजता धडाम… धडाम… असा आवाज झाला अन् अवघ्या 12 सेकंदात संपूर्ण टॉवर पत्त्याच्या बंगल्यासारखा हा टॉवर कोसळला. हा टॉवर कोसळताना पाहण्यासाठी या परिसरातील इमारतीतील लोक इमारतीच्या टेरेसवर गेले होते. तसेच हा टॉवर कोसळताना पाहण्यासाठी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. टेरेस आणि टॉवर परिसरात जत्रेसारखी गर्दी झाली होती. अनेकांनी तर हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. पाहा हे पाडकाम कसं करण्यात आलं… त्याची दृश्य…