Jarange vs Hake : खूप लाड केलेत, जरांगेंना काय झालं जरा बघा… राज्याच्या तिजोरीतून उपचार करा! हाकेंची मागणी काय?
लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर राज्याच्या तिजोरीतून उपचार करण्याची मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे यांनी हाकेंना मोजत नसल्याचे सांगत, मराठा समाजाला आतापर्यंत खूप लाड केले गेले असल्याचा टोला लगावला.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर राज्याच्या तिजोरीतून उपचार करण्याची मागणी केली आहे. ओबीसी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन देणार असल्याचेही हाके यांनी म्हटले. या निवेदनाद्वारे जरांगे पाटील यांच्यावर योग्य उपचार करण्याची विनंती केली जाईल, तसेच ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावण्याचे आवाहनही केले जाईल, असे हाके यांनी स्पष्ट केले.
एका समाजाला ईडब्ल्यूएस, एसबीसी आणि आता ओबीसी अशा विविध ठिकाणी आरक्षण देण्याबाबत लक्ष्मण हाके यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना प्रत्युत्तर दिले आहे. “मी अशा लोकांना मोजत नाही”, असे म्हणत त्यांनी हाके यांच्या टीकेला महत्त्व दिले नाही. महाराष्ट्राच्या तिजोरीतून आतापर्यंत जरांगे किंवा त्यांच्या समाजाला खूप लाड केले गेले आहेत, असा टोलाही जरांगे यांनी हाकेंना लगावला.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?

